सोलापूरजिल्हा परिषद
आयुष्यमान कार्ड काढण्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर
तीन महिन्यात काढले साडेसहा लाख कार्ड

- सोलापूर: पाच लाखाच्या कौटुंबिक आरोग्य विमा असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यात राज्यात सर्वाधिक 3 लाख 29 हजार आयुष्यमान कार्ड सोलापूर जिल्ह्याने लाभार्थींना दिले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
- राज्यात गेल्या तीन महिन्यात एकूण 92 लाख 69 हजार कार्ड काढण्यात आले आहेत. प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना असलेली आयुष्मान भारत जन आरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होत आहे. केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेद्वारे पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. दुसरीकडे राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबवण्यात येत होती. आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून ,दोन्ही योजनेचे मिळून एकच गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्या या योजनेचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे 11 लाख 59 हजार 358 तर महात्मा फुले योजनेच्या 11 लाख 88 हजार 197 इतके लाभार्थी आहेत. असे एकूण 23 लाख 47 हजार 555 लाभार्थ्यांना आता आयुष्यमान कार्ड वाटप आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. त्यापैकी गेल्या तीन महिन्यात 7 लाख 33 हजार 954 कार्ड काढले आहेत. हे कार्ड काढण्यात राज्यात सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतलेली आहे. गेल्या तीन महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर पासून 17 डिसेंबर पर्यंत राज्यात एकूण 92 लाख 59 हजार 714 आयुष्मान कार्ड काढण्यात आले. आहेत त्यात सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर आहेत.
- अशी आहे उपचार व्यवस्था51 अंगीकृत रुग्णालयात उपचार मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रती वर्ष प्रती कुटुंब 5 लाख रूपयाचे आरोग्य कवच मिळणार आहे .4 जिल्हा रुग्णालय व 47 खाजगी रुग्णालयाची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये ग्रामीण भागात 40 व सोलापूर 11 रुग्णालय असून कोणतेही रुग्ण या रुग्णालयात पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतो.
सर्व लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे व आपल्या मोबाईल मध्येही काढता येते त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत योजनेतील रुग्णालयामध्ये आरोग्य मित्रांच्या मदतीने हे कार्ड काढता येईल असे आव्हान जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.