अरे.. सोलापूर झेडपीत कपबशी आणि शिट्टीची चर्चा, काय आहे भानगड?

सोलापूर : अरे… जिल्हा परिषदेत कपबशी आणि शिट्टीची चर्चा सुरू आहे, काय आहे ही भानगड? सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक ची निवडणूक लागले असून गुरुवारी निवडणुकीत आमने-सामने असलेल्या पॅनलला चिन्ह मिळाले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा इतिहास मोठा आहे 11 मे 1934 रोजी या पतसंस्थेची स्थापना झाली आज मी 30 या पतसंस्थेचे 1396 सभासद असून 996 जणांना मतदानाचा अधिकार आहे पतसंस्थेची उलाढाल साधारणपणे 37 कोटी पर्यंतची असून यात 27 कोटीचे कर्ज वाटप आहे तर दहा कोटी भाग भांडवल आहे. सध्या या पतसंस्थेचे निवडणूक लागली आहे परिवर्तन व समर्थ पॅनलचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत या समर्थ पॅनलकडे सन 2001 पासून संस्थेचा कारभार आहे तर आता हा एक हाती कारभार संपवण्यासाठी परिवर्तन पॅनलने जोरदार तयारी केली आहे. विद्यमान अध्यक्ष विवेक लिंगराज यांनी आपल्याला सभासदांचा पाठबळ असल्याचं म्हटलं असून विरोधकांना पंढरपूर व वेळ उत्तर सोलापूर तालुक्यात उमेदवार मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. परिवर्तन पॅनलचे अविनाश गोडसे यांनी पतसंस्थेचे सभासद आता एक हाती कारभाराला कंटाळले असून सत्ताधाऱ्यांच्या दमबाजीला कोणीही घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्याकडे मतदार असून कोणी कुठेही उभा राहू शकतो असे प्रतिउत्तर दिले आहे. अपक्ष उमेदवार सुनिता भुसारे यांना ढाल – तलवार तर दिपक सोनवणे यांना विमान चिन्ह मिळाले आहे.
दोन्ही पॅनलचे उमेदवार असे…