सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस आजपासून प्रारंभ
68 लिंगाना तेलाभिषेकासाठी मानाचे सात नंदीध्वज व पालखी रवाना

सोलापूर: सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेस शनिवार दि. 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आज पहिल्या दिवशी 68 लिंगाणा तेलाभिषेक करण्यासाठी मानाचे सात नंदू ध्वज व पालखी सवाद्य मिरवणुकीस सह मार्गस्थ झाली आहे.
शनिवारी सकाळी हिरेहब्बू वाड्यात मानाच्या नंदीध्वजाचे काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी मानकरी हिरेहब्बू, देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महापालिका आयुक्त शितल तेली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बाळीवेशीतील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात मानाच्या सात नंदीध्वजाचे विधिवत पूजा झाल्यानंतर 68 लिंगाणा तेलाभीषेक करण्यासाठी हे नंदीध्वज पालखीसह मिरवणुकीद्वारे मार्गस्थ झाले. हे नंदीध्वज ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन 68 लिंगाना तेलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रशासनातर्फे मानकरी हिरेहब्बू यांना आहेर करण्यात आला. त्यानंतर हे नंदीध्वज शहरातील 68 लिंगाना तेलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले.
पालखी व नंदीध्वजाबरोबर हजारो भाविक तैलाभीषकासाठी बाराबंदीच्या वेशात निघाले आहेत. एकदा भक्तलिंग बोला हर हर च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा होणार आहे.