कॅलेंडरमधून केली मोबाईलच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती
सोलापूर झेडपी कर्मचारी पतसंस्था क्रमांक एकचा उपक्रम

सोलापूर: मोबाईलचा अनावश्यक व अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, भावनिक अवस्थेवर दुष्परिणाम होत असल्याने याचा कितपत वापर करावा? यासाठी कुटुंब व समाजामध्ये मंथन होणे आवश्यक आहे, असा सामाजिक संदेशयुक्त अशी अत्यंत वास्तवदर्शी दिनदर्शिका पतसंस्था क्रमांक 1 च्या वतीने प्रकाशित केली जात आहे, हे निश्चित समाजातील सर्व घटकांसाठी उपयोगी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक 1 वतीने आयोजित 2024 दिनदर्शिका प्रकाशना प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सीईओ आव्हाळे बोलत होत्या. केल्या . यावेळी आव्हाळे यांनी इंटरनेट व मोबाईल हे आधुनिक तंत्रज्ञान आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असले तरी त्याविषयी विशेषता मुलांमध्ये याच्या मर्यादा ठरवणे कुटुंबातील पोषक वातावरणासाठी आवश्यक आहे. सद्यस्थितीत हा विषय अत्यंत वास्तव, गंभीर आहे. या विषयाची मांडणी दिनदर्शिकेच्या माध्यमातून केली गेली हे खूप चांगली कौतुकाची बाब आहे. मोबाईल अतिवापराच्या समस्या, त्याचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय दिनदर्शिकेवर असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून दिले आहे. त्याचबरोबर या दिनदर्शिकेत नियमांचे उल्लेख व इतर आवश्यक माहिती दिलेली आहे. त्यामुळे याचा निश्चित सर्वांना फायदा होईल, अशा भावना सीईओ आव्हाळे यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी डॉ.कल्याणी राऊत, प्रकार अमोल साळुंखे, अप्पासाहेब पाटील, शाहजहान तांबोळी, महेश वैद्य ,नितीन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ईशाधीन शेळकंदे,अमोल जाधव, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ ,प्रशांत काळे, आनंद मिर्गणे, सचिन खुडे,लेखाधिकारी रूपाली रोकडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ एस.पी.माने यांनी केले. याप्रसंगी संतोष कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी जेष्ठ संचालक श्रीशैल्य देशमुख, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके ,अनिल जगताप, शेखर जाधव , शहजहान तांबोळी, विष्णू पाटील, धन्यकुमार राठोड, हरिबा सपताळे,सुंदर नागटिळक, सुखदेव भिंगे,मृणालिनी शिंदे,सुनंदा यादगिर, त्रिमूर्ती राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम, जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले.