अक्कलकोट पंचायत समितीच्या टीमने स्वीकारला अकरा लाखाचा पुरस्कार
उत्कृष्ठ अधिकारी अनिल जगताप व कर्मचारी महेश शेंडे यांचा गौरव

सोलापूर – प्रशासकिय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणारय-या पंचायत राज संस्थाना शासनातर्फे दिला जाणारा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविला. ११ लाख रुपयांचा धनादेश व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
हा पुरस्कारण वितरण सोहळा पुणे येथे विधान भवन सेन्ट्रल हॉल याठिकाणी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते पार पडला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे मार्गदर्शन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे व स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनात पंचायत समितीने मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज केले. अक्कलकोट पंचायत समितीच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आदर्श कर्मचारी सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप व कनिष्ठ सहाय्यक महेश शेंडे कुर्डूवाडी यांचा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करणेत आला.
यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराज , उपायुक्त (विकास) विजय मुळीक, उपयुक्त अस्थापना राहुल साकोरे, विभागातील सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी , प्रकल्प संचालक , उपमुख्य कार्यकरी आधिकारी प्रशासन आदी उपस्थित होते.
सण २००५ – २००६ या आर्थिक वर्षापासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विभाग व राज्य स्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत साठी हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये मागील वर्षामध्ये लोकहितासाठी केलेली विकास कामे, प्रशासकीय कामकाज, अस्थापनाविषयक कामकाज, केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी या कामकाजाचे मुल्यांकन विभागीय स्तरावरून व राज्य स्तरावरून तपासणी केली जाते . सदरील तपासणी करून केलेल्या गुणांकनाच्या आधारे अक्कलकोट पंचायत समितीस विभागीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले .
सदरील पुरस्कार स्वीकारण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेड, प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक, विस्तार अधिकारी महेश भोरे, वरिष्ठ सहाय्यक सिधाय्या मठ, गणेश ग्राम, हेमंत ऐवळे आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल पंचायत समिती अक्कलकोटचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.