सोलापूर : सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे वृद्ध जोडप्याचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचेगाव शिवारात वृद्ध जोडपे मुलापासून वेगळे राहत होते. त्या घरातून दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांनी घरात पाहिल्यावर या जोडप्यांचे मृतदेह दिसून आले आहेत. माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वृद्धेचा गळा दाबून तर तिच्या पतीचा लोखंडी खिळेने मारून खून करण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदानासाठी हलवले आहेत. या जोडप्याचा खून कोणी व कशासाठी केला याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथके घटनास्थळी दाखल होत आहेत.

More Stories
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक
झेडपी समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांचा कामाचा धडाका; बी. सी. गर्ल्स हॉस्टेल व बालगृह पाहणी
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे निकष बदलले