सीईओ कुलदीप जंगम यांनी दिलेला शब्द केला खरा
दुसऱ्या टप्प्यात सत्तेचाळीस जणांना दिली पदोन्नती

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिलेला शब्द खरा केला आहे. दुसऱ्या टप्प्यात 47 जणांना पदोन्नती देत आवडीच्या ठिकाणी नियुक्ती दिली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गेल्या आठवड्यात 37 जणांना पदोन्नती दिली होती. त्यानंतर आणखी 250 जणांना पदोन्नती देणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे मंगळवारी आणखी 58 जणांना पदोन्नतीने नुकत्या दिल्या. यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तृतीय श्रेणी देण्यात आली. पदोन्नतीचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अनिल जगताप, कनिष्ट प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, तजमूल मुतवल्ली, वरिष्ठ सहाय्यक महेश केंद्रे, कनिष्ठ सहाय्यक अरविंद सोनवणे यांनी परिश्रम घेतले. पारदर्शकपणे पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे सीईओ जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या सर्वाचे सर्व संघटनेकडून अभिनंदन होत आहे. यामध्ये मुख्यालय, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोणाकोणाला मिळाली पदोन्नतीने नियुक्ती