सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर “त्या’ शिक्षिकेने केलेला आरोप खोटा; आंदोलन केलेल्या संघटनेनेच दिले स्पष्टीकरण

सोलापूर : आदिवासी पारधी महासंघाचे कार्याध्यक्ष नरेंद्र चव्हाण, आदिवासी अनुसूचित जमातीच्या प्रदेशाध्यक्ष व माजी नगरसेविका व राजश्री चव्हाण,अनिल चव्हाण यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात येऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

शिक्षणाधिकारी जगताप यांचे काम चांगले आहे. मागासवर्गीय शिक्षकांना त्यांनी न्याय दिला आहे. नुकतीच एका शिक्षकाला अनुकंपा नियुक्ती दिली आहे. यापूर्वी एका शिक्षिकेच्या आरोपावरून संघटनेने आंदोलन केले होते पण वस्तुस्थिती समोर आल्यामुळे संघटनेने जगताप यांचा सन्मान केला. त्या शिक्षिकेने शिक्षणाधिकारी जगताप यांच्यावर केलेला आरोप खोटा होता असे चौकशीत स्पष्ट झाल्याचे माजी नगरसेविका चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, प्रा. अनुराधा पाटील, प्रा राजदत्त रसोलगीकर, प्रा विकास काटकर, प्रा. माधव पाटील, प्रा. सागर शिंदे, प्रा. सचिन वाघमोडे, दलित पॅंथरचे प्रदेश अध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले, सोलापूर जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक विश्वास गजभर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रोहिणी गायकवाड, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक दिलीप चौगुले, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button