झेडपीतील बागेत पक्षांसाठी पाण्याची सोय
मराठा सेवा संघ शाखेतर्फे सलग दुसऱ्यावर्षी उपक्रम

सोलापूर : कडाक उन्हाळ्याची चाहूल लागली असून, या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात. त्यामुळे मराठा सेवा संघाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे.
वाढत्या काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमन्यांना घर करणे शक्य नाही. यासाठी पक्षी मित्रांतर्फे कृत्रीम घरटे तयार केले जात आहेत. शहरातील प्रत्येकाने आपल्या घरी असे कृत्रीम घरटे तयार करावे म्हणजे चिमन्या वास्तव्यास येतीत असा संदेश देत जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर बागेत असलेल्या झाडांवर पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, समाज कत्याण अधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड,संतोष कुलकर्णी, संजय पारसे, मराठा सेवा संघ जि प शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर,कर्मचारी महासंघ राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, सुधाकर माने- देशमुख, नागेश धोत्रे, चेतन भोसले, श्रीकांत मेहेरकर,राजेंद्र काकडे, प्रविण वाघमारे, संदिप खरबस, ज्योत्सा साठे, सैपन जमादार व मराठा सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते. पाणपोईमुळे झेडपीच्या बागेत पक्षी मोठ्या प्रमाणात येतील, अशी अपेक्षा सीईओ आव्हाळे यांनी व्यक्त केली. तसेच या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमीनी कौतुक केले आहे.