झेडपी शिक्षकांचा होणार पुरस्कार देऊन सन्मान
नूतन सीईओ कुलदीप जंगम यांनी केली जोरदार तयारी

सोलापूर : शिक्षक दिनी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी झेडपी शाळांच्या शिक्षकांचा सन्मान करण्याची जोरदार तयारी केली आहे.
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात झेडपी प्राथमिक शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सीईओ कुलदीप जंगम यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्याशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला असून जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान व कार्यक्रमानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर विभागाच्या रखडलेल्या कार्यक्रमांनाही आता मुहूर्त मिळणार आहे.