सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

सीईओ आव्हाळे यांचे आवाहन उद्या विसरू नका ‘दो बूंद जिंदगी के”

साडेचार लाख बालकांना पोलिओचा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज

सोलापूर : भारत हा पोलिओ मुक्त देश आहे. मात्र काही देशामध्ये पोलिओ आजूनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तरी जिह्यातील नागरिकांनी जागृत राहून रविवारी ( ३ मार्च २०२४) आपल्या बालकांना पोलिओचा डोस आवश्य द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविणेबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुकाणू समितीची सभा ३१ जानेवारी रोजी घेतली आहे. या सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने,   माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४५०३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी दर्शनी ठिकाणी मोहिमेचे Banner तयार करून लावण्यात यावेत व मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सदर मोहीम १०० टक्के यशस्वी करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. पल्स पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित राहू नये याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ३१२४ लसीकरण केंद्र स्थापन केली असून ते ५ वयोगटातील ४५०३४३ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गाव पाड्यावर पोहचून लस पाजण्यासाठी १९६ ट्रान्झीट टीम व मोबाईल टीम १३९ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ७७ प्रा आ केंद्र व ४२७ उपकेंद्र तसेच ७५११ आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी ६०१ पर्यवेक्षक याचे माध्यमातून मोहिमेचे नियोजन केले असल्याचे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यानी सांगीतले. पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिनाच्या दिवशी डोस देण्यात आला नसेल तर वंचित राहिलेल्या बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च २०२४ (३ दिवस ) शहरी भागात दिनांक ५ ते ९ मार्च २०२४ (५ दिवस) पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button