सोलापूरक्राईम

सोलापूरच्या वकिलाला दिल्लीच्या ठकसेनाने ऑनलाइन गंडवले

बचत खात्याच्या केवायसीचा मेसेज देऊन 16 हजार हडपले

सोलापूर : बचत खात्याची केवायसी करा असा मेसेज देऊन नवी दिल्लीतील एका  ठकसेनाने सोलापुरातील वकिलाला 16 हजाराला गंडविल्याचा प्रकार शनिवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नवी दिल्लीच्या ‘त्या” ठकसेनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरातील अभिषेक नगरातील रहिवासी एडवोकेट प्रविण चंद्रकांत निकम यांना,
८४८४९६४५२९ या भ्रमणध्वनी क्रमांकावरुन आलेल्या मेसेजमध्ये तुमचे केवायसी तुमच्या स्टेट बँकेच्या खात्याशी संलग्न करा अथवा बचत खाते ब्लॉक करण्यात येईल असा मेसेज आला होता.
या संदेशानुसार आपले बचत खाते ब्लॉक होऊन अडचण होऊ नये, यासाठी प्रविण निकम यांनी, दुसऱ्या दिवशी, त्यांच्या मोबाईल मेसेज बॉक्समध्ये आलेली लिंक क्लिक करून पुढील प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या खात्यावरील १६, ८१६ रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यानंतर निकम यांनी वरील मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल स्विच ऑफ लागत होता. शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निकम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी नवी दिल्लीत राहणाऱ्या मोबाईल क्रं. ८४८४९६४५२९ चा वापरकरता प्रल्हाद दुरा (गल्ली नं. ३, आया नगर, नई दिल्ली) याच्याविरुद्ध भादवि ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम क ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि गायकवाड करीत आहेत. सोलापुरात आत्तापर्यंत अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक अनेकांची झाली आहे . आता वकीलही यातून सुटला नसल्याने सोलापुरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button