उत्तर सोलापूरचे “मालक’ ठरले विजयकुमार देशमुखच

सोलापूर : सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला आहे. या निवडणुकीतून खऱ्या अर्थाने ते उत्तरचे “मालक’ ठरले आहेत. शहर उत्तर मतदार संघात यावेळेस बुधवार पेठेतील नेत्यांनी त्यांना चांगली साथ दिली. राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाई आठवले गट युतीमुळे या भागात भाजप पहिल्यांदाच प्लसमध्ये आले.
भाजपने सोलापूर जिल्ह्यासाठी सहा जागा दिल्या होत्या. त्यात माळशिरसची राम सातपुते यांची जागा गेली आहे. असे असले तरी शहर “मध्य’ ची काँग्रेसची जागा हिसकावून घेण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप प्लस मध्येच राहिले आहे. मोहळमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यशवंत माने यांचा पराभव झाला आहे. अनगरचे अप्पर तहसील कार्यालय हा येथे कळीचा मुद्दा ठरला. त्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांचा प्रभाव कमी पडला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी त्यांच्या गावांमधून चांगला धक्का दिल्यामुळे राजू खरे विजयी झाले. माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे. तरीही या मतदारसंघात भाजपला चांगली मते मिळाली आहेत हे नाकारून चालणार नाही. बऱ्याच फेरीत सातपुते आघाडीवर होते. शेवटच्या फेऱ्यांमध्ये जानकर यांना आघाडी मिळाली. सोलापूर शहर उत्तर, मोहोळ आणि माळशिरस मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे आहेत.
उत्तर सोलापूर…
विजयकुमार देशमुख : 117215
महेश कोठे : 62632
परशुराम इंगळे: 1155
शीलवंत काळे : 1547
अमित गायकवाड: 237
जुबेर पटेल : 1885
दत्ता थोरात: 138
युवराज लिंबोळे : 73
राजू शिंदे : 112
विक्रांत गायकवाड : 2477
अजित मुत्तूर : 47
विजयकुमार उघडे : 197
दत्तात्रय पांढरे : 211
मल्हारी पाटोळे : 109
मारुती सावंत : 319
गुरुशांत मोकाशी : 697
मोहसीन बागवान : 1693
विष्णू खंदारे: 387
शोभा बनशेट्टी : 554
संतोष कोठे : 705
मोहोळ…
राजू खरे : 125838
यशवंत माने: 95636
बळीराम मोरे: 1029
नंदू शिरसागर : 700
नागनाथ शिरसागर : 629
अमोल बंगाळे : 801
अनिल आखाडे : 4251
कृष्णा भिसे : 342
सुरेश थोरात: 806
संजय शिरसागर : 705
उत्तम जानकर : 120322
राम सातपुते : 108057
सुरज सरतापे : 1308
राज यशवंत कुमार : 2246
सुनील लोखंडे : 421
अरुण धाईंजे : 547
कुमार लोंढे : 200
दादा लोखंडे : 308
नामदास अंकुश : 3030
मनोजकुमार सुरवसे : 257
सुधीर पोळ : 608
त्रिभुवन धाईंजे : 1692