सोलापूरहवामान

बापरे..! सोलापुरात उन्हामुळे पेट्रोल पंपात स्कॉर्पिओ पेटली

मंगळवेढा महामार्गावरील देगाव येथील घटना

सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा 44 अंशाच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी ही सोलापुरात उन्हाचा कडाका वाढलेलाच दिसून आला. सूर्य जणू आग ओकू लागला आहे असा भास लोकांना जाणवत आहे. दुपारी बाजार बारा वाजेनंतर रस्ते सुनसान होत आहेत. उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळे नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी सावलीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे वाढत्या तापमानामुळे अक्कलकोट व हैदराबाद महामार्गावर  बस पेटलेल्या घटना ताज्याच  असताना शुक्रवारी दुपारी मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओने पेट घेतला आहे.

अक्कलवाडे पेट्रोल पंपावर ही घटना घडली. याबाबत माहिती देताना शिवराज पाटील म्हणाले की डिझेल भरण्यासाठी स्कॉर्पिओ आली. डीझेल भरत असताना कर्मचाऱ्यांना इंजिनजवळ शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओ चालकाला तात्काळ गाडी पुढे घ्यायला लावली व पंपावरील प्रतिबंधक साहित्याचा वापर करण्यात आला. पण उपयोग झाला नाही इंजिनातून आज भडकली. बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. त्यामुळे फायर ब्रिगेडला संपर्क साधण्यात आला. फायर ब्रिगेडने घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.  पण तोवर गाडी जळून खाक झाली. स्कॉर्पिओला आग लागल्यानंतर पेट्रोल पंपावरील सर्व सुरक्षा उपाययोजना कडक करण्यात आल्या व पंप निर्मनुष्य करण्यात आला. ही गाडी एका आमदार पुत्राची असल्याची समजते.

पहा हा व्हिडिओ…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button