March 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरची कन्या पदोन्नतीने झाली धाराशिवची अप्पर जिल्हाधिकारी

सोलापूर : महाराष्ट्र शासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीत सोलापूरची कन्या ज्योती पाटील यांची धाराशिवचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने विभागामार्फत निवड सूची कार्य 2024- 25 उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गात पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यामध्ये सोलापूरच्या आरडीसी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व भूसंपादनचे प्रमोद गायकवाड यांची अकोल्याच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर धाराशिवच्या अपर जिल्हाधिकारीपदी ज्योती पाटील यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे त्यामुळे मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील राहिवासी आहेत. तलाठी पदापासून ते अप्पर जिल्हाधिकारी या पदापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.सोलापूर प्रांताधिकारी म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. तिथून कोरेगाव येथे त्यांची बदली झाली होती. त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सोलापूरकरांना आनंद झाला आहे. विशेष म्हणजे धाराशिवच्या आरडीसी शोभा जाधव याही सोलापूरच्या कन्या आहेत.