सोलापूरपोलिस

दहा हजाराची लाच घेताना उपलेखापाल अटकेत

मजूर सोसायटीबाबत पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी मागितली लाच

सोलापूर : दक्षिण सोलापुरातील बोरामणी येथील मजूर सोसायटीबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी सोसायटीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी 30 हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना सहकारी संस्था वर्ग 3 च्या कार्यालयातील उपलेखापाल शिवाजी उंबरजे (वय – 57, रा. यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमठा नाका) याला लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.

याबाबत बोरामणी येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमनने तक्रार केली होती. या चेअरमनच्या मधुर संस्थेविरुद्ध त्यांच्या पत्नीने सहकार संस्थांच्या सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या संस्थेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपलेखा परीक्षक उंबरजे यांच्याकडे देण्यात आले होती. त्यावर चेअरमननी त्यांच्याशी संपर्क साधला. संस्थेच्या बाजूने अहवाल देण्यासाठी उंबरज्या आणि तीस हजार लाचेची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून दहा हजार घेण्याचे मान्य केले. याबाबत लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर या विभागाने 15 एप्रिल रोजी पडताळणी केली. बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा लावला असता दहा हजार रुपये लाच घेताना उंबरजे यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत उंबरजे यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

One Comment

  1. श्रीम. सुषमा दत्तात्रय बारवकर,विषयशिक्षिका,जि.प.प्रशाला, माढा says:

    मी ३१ मे २०२५ ला विषय शिक्षिका, जि.प.प्रशाला माढा, जि. सोलापूर या शाळेतून रिटायर होत आहे पण अद्याप माझे सेवा पुस्तक मा. पाटील साहेब , लेखाधिकारी,जि.प. सोलापूर यांचेकडे वेतन पडताळणी साठी सहि होण्यास तिथपर्यंत जात नाही पोहोचत नाही, संबंधित कर्मचारी यांना माझ्या मिस्टरांनी समक्ष भेटून विनंती केली तरी अद्याप पडताळणी होऊन पं.स.कूर्डूवाडी येथे ते परत यायला हवे होते पण अजून आले नाही तरी कृपया यावर ताबडतोब कार्यवाही व्हावी ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button