सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्पीड ब्रेकरवर अखेर मारले पट्टे
'सोलापूर समाचार'च्या वृत्ताची दखल*

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील धोकादायक स्पीड ब्रेकरवर अखेर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी हा स्पीड ब्रेकर दिसत नसल्याने अपघातांची मालिका सुरू होती.
या संदर्भात ‘सोलापूर समाचार’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने स्पीड ब्रेकरवर थर्मोप्लास्ट पट्टे मारले आहेत.आता रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा स्पीड ब्रेकर लांबूनच दिसणार असून अपघातांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यापूर्वी याच ठिकाणी अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले होते. एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचा आहे दावा केला जात आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजता स्कूटरवरील दोन मुले गंभीर जखमी झाल्याचे वृत्त सोलापूर समाचार ने प्रसिद्ध केले होते. यानंतर “स्पीड ब्रेकर की लाइफ ब्रेकर’ असा संताप नागरिकांतून व्यक्त होत होता. या वृत्ताची दखल घेत स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. नागरिकांनी या कार्यवाहीचे स्वागत केले असून इतर धोकादायक स्पीड ब्रेकरवरही असे पट्टे मारावेत, अशी मागणी होत आहे.



