सोलापूरजिल्हा परिषद

स्मशानभूमीत असा फोटो कोणी काढतो का? पण तसं कामच केलं या पट्ट्यांनी

स्वच्छता ही सेवा अंतर्गत जिल्ह्यातील ७३० पेक्षा अधिक गावांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

सोलापूर – जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत एक तास गावा साठी श्रमदान या महास्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

जिल्ह्यातील ७३० पेक्षा अधिक गावांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील प्लास्टिक, अस्वच्छ ठिकाणे. मंदिराचा परिसर, शाळा व अंगणवाडी चा परिसर, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणेत आली.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायती मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या गावांत दर रविवारी सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्याची सवय ग्रामस्थांना झाली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शना खाली सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा हा उपक्रम करणेत आलेला आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी परिश्रम घेतले.

सार्वजनिक स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता..!

ज्या ज्या गावांत दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते त्या गावातील तंटे व वाद कमी झाले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, बीबीदारफळ , अकोलेकाटी, सांगोला तालुक्यातील चिणके, अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रूक, मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी, करमाळा तालुक्यातील कोर्टी या ग्रामपंचायती मध्ये दर रविवारी स्वच्छता मोहीम घेतली जात आहे.

*सार्वजनिक परिसर चकाचक..!*

सेवा संकल्प अभियानामुळे विविध विभाग या अभियानात एकवटले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, रस्ते, चौक, पर्यटन ठिकाणे, मंदिरे,तीर्थक्षेत्रे व प्रार्थना स्थळे व नदी परिसर, जलस्रोत परिसर तसेच इतर आवश्यक ठिकाणी सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेने परिसर चकाचक झाला आहे. परिसरातील प्लास्टिक संकलन देखील करणेत आले आहे. बार्शी तालुक्यातील सौंदरे ग्रामस्थांनी संपुर्ण गाव स्वच्छ केला आहे. चार ट्राली कचरा संकलित केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे तीन तास श्रमदान सुरू होते.

**नावासाठी नाही..,फक्त गावांसाठी* *बिबिदारफळ चा ३८ वा स्वच्छता दिवस..!*

उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारफळ येथील ५४ पेक्षा अधिक ग्रामस्थ गेल्या ३८ आठवडे स्वच्छता करीत आहेत. एक रविवार गावांसाठी हा उपक्रम जिल्ह्यात प्रेरणादायी ठरत आहे. *नावासाठी नाही..,फक्त गावांसाठी* हे टायटल राज्यात फेमस झाले आहे. दर रविवारी हा उपक्रम राबविला जातो. सेवा संकल्प अभियानात या उपक्रम राज्यात एका उंचीवर गेला आहे. अनेक गावांत बिबिदारफळ चा आदर्श घेत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला आहे. सामज माध्यमांवर लाखो लोक हा उपक्रम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button