झेडपी कर्मचारी सहकारी पतसंस्था नि. नं. १ च्या चेअरमनपदी तजमुल मुतवल्ली तर व्हा. चेअरमनपदी चेतन वाघमारे यांची बिनविरोध निवड
माजी चेअरमन श्वेतांबरी राऊत व माजी व्हा. चेअरमन श्रीधर कलशेट्टी यांनी सहकार्याबद्दल आभार मानले

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नं. १, या संस्थेच्या बुधवारी झालेल्या सभेत चेअरमनपदी दक्षिण सोलापूर पंचायत समितीमधील तजमुल अब्दुल जलील मुतवल्ली यांची तर व्हा. चेअरमनपदी चेतन अनिल वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही सभा अध्यक्षीय अधिकारी डी. एस. भवर, (सहाय्यक उपनिबंधक, उत्तर सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार अध्यक्षीय अधिकारी भवर यांनी केला. माजी चेअरमन श्वेतांबरी राऊत व माजी व्हा. चेअरमन श्रीधर कलशेट्टी यांनी सहकार्याबद्दल आभार मानले. नूतन चेअरमन मुतवल्ली यांनी सर्वांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे करू, असे सांगितले. व्हा. चेअरमन वाघमारे यांनी संस्थेची प्रगती करू, असे मत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक श्रीशैल देशमुख, व्ही. आर. गरड, प्रकाश शेटे, अशोक भोसले, पंडित भोसले, दयानंद परिचारक यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.



