सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयबँका- पतसंस्था

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

सोलापूर : बँक ऑफ इंडिया आरसेटीच्या प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास; 75 हजारांच्या स्वभांडवलातून उभारला व्यवसाय, आज दरमहा 40 हजारांचे उत्पन्न मिळवणारे मोहोळ तालुक्यातील औंढी येथील अभिमन्यू दिलीप चव्हाण (वय ३३) हे आज ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना ‘आपले स्वतःचे काहीतरी असावे’ या जिद्दीने त्यांनी १७ जुलै ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान बीओआय स्टार आरसेटी, सोलापूर येथे ‘मेन्स पार्लर आणि सलून उद्यमी’ प्रशिक्षण घेतले. केस कापण्याच्या पद्धती, ग्राहक सेवा आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.

१३ मे २०२५ रोजी स्वतःच्या बचतीतील ७५ हजार रुपयांतून त्यांनी स्वतःचे सलून सुरू केले. चांगली सेवा, स्वच्छता आणि नम्र वागणुकीमुळे ग्राहक वाढले. आज त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे ४० हजार रुपये असून त्यांनी एका युवकाला रोजगारही दिला आहे.

“आरसेटीने मला फक्त व्यवसाय नाही, तर आत्मविश्वास दिला,” असे अभिमन्यू सांगतात.

थोडक्यात माहिती:

– नाव: अभिमन्यू दिलीप चव्हाण, औंढी, मोहोळ

– प्रशिक्षण: मेन्स पार्लर, BOI RSETI Solapur

– कालावधी: 17 जुलै – 15 ऑगस्ट 2024

– गुंतवणूक: 75 हजार | उत्पन्न: 40 हजार/महिना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button