सोलापूरराजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “या’साठी केला झेडपी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सन्मान

सोलापूर : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्याबद्दल इंद्रजीत पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॉफी देऊन सन्मान केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापुरात मंगळवारी भाजपचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सभापती, महापालिकेचे पदाधिकारी अशा 25 जणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य बार्शीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे भाजपच्या विजयी मेळाव्यास वेळेत पोहोचू शकले नाहीत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व इतर सभापतींचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्रॉफी देऊन सन्मान केला. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाल्याबद्दल उपाध्यक्ष पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा परिषदेत आणखी जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button