सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई

कामकाजाकडे दुर्लक्ष करून केली गंभीर अनियमितता

सोलापूर :  माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्यामुळे त्यांना शासनाने निलंबित केले आहे, अशी माहिती महसूल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

माढा तालुक्यातील उजनी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने 13 फेब्रुवारीच्या पत्राअन्वये संबंधितांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून तहसीलदार रणवरे यांच्याविरुद्द निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांना सादर केलेला होता.याप्रकरणी शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 23 एप्रिलच्या आदेशान्वये माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी कार्यालय प्रमुख या नात्याने कामकाजावर नियंत्रण ठेवले नसलेचे आणि कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी देऊनही सुधारणा केली नाही. तसेच अवैध गौण खनिज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई केलेली नसणे, खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतरही वरिष्ठ कार्यालयास सादर न करणे तसेच कार्यालयाच्या तपासणीनंतर शतकपूर्तीवेळी सदरच्या बाबी निदर्शनास आलेल्या असतानाही तहसीलदार रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्यामुळे त्यांना शासनाने निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

माढा तालुक्यातील अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण न ठेवणे व अन्य प्रशासकीय बाबीतील अनियमिततेमुळे माढा तहसीलदार विनोद रणवरे यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वी शासनाला पाठवण्यात आला होता. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक 23 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये माढा तहसीलदार रणवरे यांना निलंबित केलेले आहे. तरी यापुढे अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण न ठेवणे तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितावर अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा ईशारा
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button