सोलापूरसोलापूर ग्रामीण पोलीस

ट्रॅक्टर मालकाकडून लाच घेताना वाफळेचे तलाठी सुदर्शन जाधव यांना पकडले

सोलापूर: मुरूमचे पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना वाफळेचे तलाठी सुदर्शन जाधव यांना रंगेहात पकडले.

आरोपी लोकसेवक सुदर्शन रमेश जाधव, पय ३० वर्षे, पद- तलाठी, सज्जा वाफळे (ता. मोहोळ, जि. सोलापूर, गृ मु.पो. विठठलमाडी, ता. माळा जि. सोलापूर) यांनी दि. २७ मार्च रोजी तक्रारदार व त्यांचे सोबत इतर दोन ट्रैक्टर मालक यांचे ट्रॅक्टर मुरुम वाहताना वाफळे गावामध्ये पकडले होते सदरचे ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी व सोडून देण्यासाठी नमूदलोकसेवक सुदर्शन जाधव यांनी तक्रारदार व त्यांचे सोबतचे इतर दोन ट्रैक्टर मालक यांचे कडून प्रत्येकी ३३,००० रुपये असे मिळून १९००० रुपये देण्याचे उरले होते. त्यापैकी इतर दोन ट्रैक्टर मालक यांनी प्रत्येकी ३३००० रुपये असे म्हणून ६६००० रुपये दिले व तक्रारदार राजकिरण सावंत यांच्याकडे २३००० रुपये असल्याने त्यांनी तेवढेच रक्कम दिली होती, तक्रारदार यांच्याकडून उर्वरित १०,००० रुपये येणे बाकी असल्याने लोकसेवक सुदर्शन जाधव तलाठी यांनी सदरची रक्कम तक्रारदार यांना विनांक २८ मार्च रोजी देण्याबाबत सांगितले होते. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी व सापळा कारवाई केली असता आरोपी लोकसेवक सुदर्शन रमेश जाधव यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम १०,००० रु. स्वत्तःकरीता व त्यांचे वरिष्ठांकरीता स्विकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, माढा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, संतोष नरोटे, अक्षय श्रीराम सर्व नेमणूक एसीबी सोलापूर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button