सोलापूरक्राईम

साडेपाच लाखाची लाच घेताना दोन हवालदार असं झिरोनाही अटक

सोलापूर : भाड्याच्या वादातून अक्कलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या 2 पोलीस हवालदारांसह 2 खाजगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 5 लाख 50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री माळशिरस तालुक्यात करण्यात आली.

घटनाक्रम असा घडला

21 ऑगस्ट : पुणे येथील लायसन्स कन्सल्टंट यांनी ला.प्र.वि. पुणे यांच्याकडे तक्रार दिली. तक्रारीत म्हटले की, त्यांच्याविरुद्ध अक्कलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलीस हवालदार अनिल शिंदे यांनी त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची लाच मागितली आहे.

24 ऑगस्ट : ला.प्र.वि. ने तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीत अनिल शिंदे आणि खाजगी इसम आबा बळकुंदे यांनी मिळून 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

27 ऑगस्ट : सौदा 5.5 लाखांवर ठरल्यानंतर खाजगी इसम आबा बळकुंदे आणि महादेव माने यांनी तक्रारदाराला भेटून पैसे आणण्यास सांगितले.

28 ऑगस्ट : ठरल्याप्रमाणे माळशिरस येथील मार्केट पिलर रोडजवळ पैसे स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले. ला.प्र.वि. च्या पथकाने सापळा लावून यावेळी 5,50,000/- रुपये स्वीकारताना चौघांनाही ताब्यात घेतले.

कोण आहेत आरोपी?

1. अनिल महादेव शिंदे – वय 39, पोलीस हवालदार ब.न. 1659, नातेपुते पोलीस स्टेशन.

2. राहुल माणिक वाघ – पोलीस हवालदार.ब. न. 1818, माळशिरस पोलीस स्टेशन.

3. आबा बळकुंदे – वय 48, खाजगी वाहन चालक, रा. बळकुंदे वस्ती, माळशिरस.

4. महादेव माने – वय 39, मोबाईडी, रा. मोबाईडी, माळशिरस ).

या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता दोन्ही हवालदारांना अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button