सोलापूरजिल्हा परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला सोलापूर झेडपीने गुरुजींना दिले गिफ्ट

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीईओ कुशल जैन यांनी पारदर्शकपणे पार पाडली समायोजन प्रक्रिया

सोलापूर : जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात करीत सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करणेत आले होते. या अभियानाचा शुभारंभ नूतन ३३२ शिक्षकांना जागेवर समुपदेशनाने नियुक्ती देऊन सुरुवात केली. सामान्य प्रशासन विभागाने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झालेबद्दल सेवा संकल्प
अभियानाचे आयोजन करणेत आले होते. शिक्षण विभागात प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथील पांडुरंग ज्ञानेश्वर शिंदे व आदिती चव्हाण या उमेदवारास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचेहस्ते नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करणेत आला. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शिक्षण व आरोग्य समितीचं सभापती चेतनसिंह केदार, महिला व बाल कल्याण विभागाचे सभापती अमृता वाघे, कृषी व पशु संवर्धन विभागाचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ प्रमुख उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाने गटविकास अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन सोलापूर जिल्ह्यात या सेवा संकल्प अभियानाचे विशेष नियोजन केले आहे.
स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा: अध्यक्ष वैद्य

सोलापूर जिल्ह्यातील बीबीदीरफळ व मार्डी सारख्या ग्रामपंचायती दर रविवारी ग्रामस्थ एकत्र येऊन गावांत स्वच्छता करतात. लोकांना चांगल्या सेवा देणेबरोबर स्वच्छता ही सेवा हा उपक्रमांची व सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा.
सिईओ कुशल जैन यांनी जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाचे चांगले नियोजन केले आहे. या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी व सेवा देणेसाठी संकल्प करा. सेवा संकल्प अभियान महिना भर चांगले राबवा. त्यापुढे देखील अभियान चांगले राबवा असे आवाहन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवा कार्याच्यानिमित्ताने गौरव होत असल्याचे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले.
एक दिवस द्या: उपाध्यक्ष पवार
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी संकल्प सेवा अभियाना बरोबर २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता महा श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केलें. बिबिदारफळ मध्ये ४९ वा रविवार आहे. मार्डीने याची सुरुवात केली. अकोलेकाटी व बिबिदारफळ या कामात पुढाकार घेऊन श्रमदान करीत आहे. एक दिवस स्वच्छतेसाठी द्या असे आवाहन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले.

लोकांना चांगल्या सेवा द्या: सिईओ जैन

सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्य मंत्री समृद्धी पंचायतराज अभियानातील घटकांची चार सप्ताहात प्रभावी अंमलबजावणी करा. असे आवाहन सिईओ कुशल जैन यांनी केले.
ग्रामविकास व पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकास विभागाने दिलेले सुचना नुसार चार सप्ताहात विशेष सेवा द्या. सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणीस गती द्या. स्वच्छता ही सेवा २०२६ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन जलसंधारणाची कामे हाती घ्या असे आवाहन सिईओ जान यांनी केले. शिक्षण विभागातील ३३२ शिक्षकांचे समुपदेशन घेऊन नियुक्ती देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात केला आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे सिईओ जैन यांनी सांगितले.

शिक्षण विभागाची सुरुवात: सभापती केदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवाकार्याचा सन्मान म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने राज्यात चांगली सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाली. माझा विभागाने केलेली सुरुवात मनाला समाधान देणारी आहे. मार्डी व बिबीदारफळ सारख्या गावांचा स्वच्छतेचा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्तविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले. ग्रामविकास विभागाने दिलेले मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानात केलेल्या नियोजनाची माहिती दिली. शिक्षण विभागाच्या माध्यमातून ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश वितरण करण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाधिकारी विशाल मुळे व त्यांचे टीमने समुपदेशन घेऊन पारदर्शी पध्दतीने ही नियुक्ती देणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सांगितले. प्रारंभी समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी समाजकल्याण विभाग व महिला व बाल कलियाण विभागाचे नियोजन सांगितले. तसेच माध्यमिक शिक्षणाधिरी सचिन जगताप, जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड यांनी आपापल्या विभागाचे संकल्प सेवा अभियानातील उपक्रमाचे नियोजन सांगितले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button