सोलापूरजिल्हा परिषद

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात

सेवाज्योत बाइक रॅलीने वेधले लक्ष

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्त दि. 17 सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियानाचे पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैदय, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे हस्ते वृक्षारोपन करून उद्घाटन करणेत आले.

याप्रसंगी शिक्षण व आरोग्य समिती सभापती केदार सावंत, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बाल कल्याण समिती अमृता वाघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, प्रसाद मिरकले, पंचायत समिती सदस्य विजय राठोड, बलवान गोतसुर्वे, सहा. गट विकास अधिकारी सनी चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, तालुका वैद्यकिय अधिकारी निलम घोगरे, उपअभियंता ग्रापापु दत्तात्रय सोनवणे, उपअभियंता एजाज मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवा संकल्प अभियानात शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, लोकसहभाग वाढविणे, ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विकास कामांना गती देणे बाबत सुचित केले.यानंतर सेवाज्योत बाइक रॅली काढणेत आली.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ट प्रशासन अधिकारी मनिषा वास्ते, कृषि अधिकारी उमेश काटे, विस्तार अधिकारी सुरेश राठोड, शिवानंद सोलापुरे, ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, समीर शेख, मृणालनी शिंदे, त्रषिकेश जाधव,शरद वाघमारे, जिलानी अन्सारी, अभिमन्यू कांबळे, विनायक कुंचपोर, सुधीर फुलारी,रुपाली मोरे, स्नेहा जाधव, गजेंद्र कुमटेकर, मिलन बिराजदार, अंजली पाटील, संदीप घोडके, अश्विनी बिराजदार,सचिन अंबेकर,अविनाश गायकवाड, कैलास जिंदे, पंडीत व्हनमाने यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button