सोलापूर

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने यांनी पदभार स्वीकारला

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलेल्या सेवेचा होणार जिल्ह्यासाठी उपयोग

सोलापूर : जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून गुरुवारी डॉ.सुहास माने यांनी पदभार स्वीकारला.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील 12 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या. पुणे आरोग्य मंडळाच्या उपसंचालकपदी डॉ. राधाकिशन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांची सातारा येथील सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्राच्या रिक्त वैद्यकीय अधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी सोलापूरचा पदभार सोडला. सोलापुरात फार कमी काळ त्यांची सेवा झाली. तुळजापूर येथे बांधलेल्या दवाखान्याच्या बांधकामासंबंधी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.आरटीआय कार्यकर्त्याच्या पाठपुराव्यावरून राजकीय वैमनस्यातून एक फूट वाढलेल्या बांधकामासाठी माझे नाव घेण्यात आले,  असा खुलासा त्यांनी केला होता. आरोग्य विभागाच्या मुंबई कार्यालयातील डॉ. सुहास माने यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती झाली आहे.  त्यांनी गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील कार्यालयात येऊन पदभार घेतला. डॉ. माने हे मूळचे साताऱ्याचे असून यापूर्वी त्यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात सेवा बजावली आहे. कोकण, मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांनी काम केले आहे. या अनुभवाचा जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button