क्राईमसोलापूर

सोलापुरात दुचाकी दुभाजकावर आदळून तीनजण ठार

सोलापूर: सोलापुरातील महावीर चौकात दुचाकी दुभाजकावर आदळून तीन तरुण जागेवरच ठार झाले आहेत. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

या अपघातात इरण्णा मठपती (वय २४),निखिल कोळी (वय २४) व आतिश सोमवंशी (वय २२, तिघे रा. जुळे सोलापूर) अशी मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास पल्सरवरून घरी निघाले होते. होटगी रोडवरील महावीर चौकात ते आले असता, त्यांची गाडी दुभाजकावर आदळली. त्या अपघातात तिघे गाडीवरून लांब उडून पडले. डोक्याला जबर मार लागल्याने ते जागेवरच ठार झाले. सदर बझार पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेजण मित्र असून शहरात पार्टी करून रात्री उशिरा घराकडे निघाले होते. वेगाने जाणारी त्यांचे दुचाकी दुभाजकावर आदळल्याने हे तिघे उडून रस्ते व फुटपाथवर पडले. त्यात डोके फुटल्याने तिघांचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच गुरुदेवदत्तनगर व अक्षय सोसायटीत शोककळा पसरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button