शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून सोलापूरच्या it इंजिनिअरची लाखोंची फसवणूक
इंस्टाग्रामवरील रिल्स पाहणे पडले महागात

सोलापूर : इन्स्टाग्रामवरील शेअर मार्केटच्या रील्स पाहून संपर्कात आलेल्या भामट्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून बनावट ट्रेडिंग ॲपवर गुंतवणूक करायला लावून सोलापूरच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील न्यू सुनिल नगरात राहणाऱ्या वर्क फ्रॉम होम असे काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
*काय घडले :*
दि. 16/08/2026 रोजी फिर्यादी इन्स्टाग्रामवर शेअर मार्केटचे व्हिडिओ पाहत असताना `harrisselseu93xhj2` या आयडीवरून DM आला. त्याने `x-189 ORBIS Wealth Academy` नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपवर Stock Related Tips, Negotiated Deal व IPO मधून High Profit चे आमिष दाखवले जात होते. त्यानंतर मो.क्र. 6366872360 (Ruchika Whishaw) यावरून प्रायव्हेट मेसेज आला. ORBIS DMA Account ओपन करण्यास सांगून `ORFin Acad` नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावले. ॲपमध्ये KYC व अकाऊंट डिटेल भरून घेतले.सुरुवातीला दि. 26/08/2026 रोजी 5,000 रुपये फोन पे द्वारे भरायला सांगितले. ॲपमध्ये ती रक्कम दिसू लागली आणि रोज दुपारी 3.30 वा. Negotiated Deal चे स्टॉक नेम व कोड पाठवून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.15 ते 9.30 मध्ये विक्रीचे इन्स्ट्रक्शन दिले जात होते. त्यातून नफा दिसू लागल्याने फिर्यादीचा विश्वास बसला.त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम पाठवायला लावली. त्यानंतर 4,000 रुपये टाकून विड्रॉल टेस्ट केली, ती यशस्वी झाल्याने पूर्ण विश्वास बसला. फिर्यादीने 02/09/2026 ते 03/09/2026 दरम्यान – 5,00,000 (Sri Sai Logistic And Cargo), 10,00,000 (MS Dinesh Verma) यांसह एकूण लाखो रुपये RTGS/NEFT ने वेगवेगळ्या खात्यांवर पाठवले.
ॲपमध्ये शेअर्स खरेदी-विक्रीतून नफा व मुद्दल वाढताना दिसत होते. दि. 04/09/2026 रोजी Qualiance International Limited ST व Pranav Construction Limited चा IPO Apply केला. दि. 07/09/2026 रोजी ॲप चेक केले असता पैसे काढता येईनात, तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सायबर ठगांनी फिर्यादीला या काळात 44 लाख 78 हजार आला फसवल्याचे दिसून आले. या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणूक व आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.
*सूचना :* अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप, बनावट ट्रेडिंग ॲप आणि जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


