सोलापूरजिल्हा परिषद

तुम्ही घरकुलाचे लाभार्थी आहात काय? 15000 चा हप्ता उचलला आणि दुसरा…

जागेचा प्रश्न सोडविण्याची मोठी मोहीम

सोलापूर : तुम्ही घरकुलाचे लाभार्थी आहात काय? पंधरा हजाराचा पहिला हप्ता उचलला आहे व दुसरा हप्ता मिळत नाही? काय आहेत अडचणी याबाबत मोहीम उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

घरकुल योजनेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यात पंधरा हजाराचा पहिला हप्ता घेऊनही बांधकाम न केलेल्यांचे संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. घरकुलाचा पहिला हप्ता घेऊनही अनेकांनी बांधकाम का सुरू केले नाही याबाबत मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या जागेचे अडचण असेल तर त्याबाबत प्राधान्याने लक्ष घालण्यात आले आहे. ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांनी गावठाण भागात शेड मारून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे. आता याच शेडमध्ये त्यांना घरकुल बांधायचे आहे पण गावठाणची जागा असल्यामुळे जागेची नोंद मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत. गावठाण ची जागा नियमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. इतर अडचणी काय आहेत याबाबत ही माहिती घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पहिला हप्ता घेतलेल्या लाभार्थ्यांनी नियमाप्रमाणे बांधकाम केले असेल तर दुसऱ्या हप्त्याच्या यादीत त्यांचे नाव येणार आहे. त्यामुळे ही पक्रिया वेगाने राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. घरकुलाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही मोहीम असून त्यानंतर नव्याने मंजूर झालेल्या घरकुलांना गती देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button