सोलापूरजिल्हा परिषद

सागर सोनवणे सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे समाजकल्याण अधिकारी

दोन वर्षासाठी दिला तात्पुरता पदभार

सोलापूर : राज्यसेवा परीक्षेद्वारे नव्याने नियुक्त झालेल्या 39 उमेदवारांना सामाजिक न्याय विभागाने राज्यभर समाजकल्याण कार्यालय व जात पडताळणी कार्यालयात दोन वर्षासाठी परीविक्षाधीन कालावधी करिता नियुक्ती दिली आहे. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी म्हणून सागर सोनवणे नियुक्त झाले आहेत.

सामाजिक न्याय विभागाने राज्यातील समाज कल्याण व जात पडताळणी कार्यालयात रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, जात पडताळणी अधिकारी या पदांवर नव्याने भरती झालेल्या अधिकाऱ्यांना परीविक्षाधीन अधिकारी म्हणून दोन वर्षासाठी नियुक्ती जाहीर केली आहे. खमितकर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ समाजकल्याण अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे सध्या महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या आखत्यारीत रिक्त असलेल्या जागांवर अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यात सोलापूरच्या समाजकल्याण विभागासाठी सोनवणे यांना नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागातील कामांना आता गती मिळणार आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेला येणारे अधिकारी नवेच असल्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या कामाची पद्धत त्यांना समजावून घेण्यास वेळ लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button