
सोलापूर : प्रभाग क्र 3 घोंगडेवस्तीतील मंगल कार्यालय, कुंभार वेस, कपाळे ब्रिज येथील तिन्ही नाल्याचे ब्रिज नव्याने बांधणेकामी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नाने 92 लाख मंजूर झाले आहे.
नगरसेवक राजकुमार पाटील यांनी मनपाचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना कामाच्या प्रत्यक्ष जागी नेऊन पाहणी केली. यावेळी संबंधित मक्तेदार व अधिकाऱ्यांना नाल्याचे ब्रिज बांधणेकामी तसेंच नाल्यातील गाळ काढून साफसफाई करण्यासंदर्भात संबंधितना आयुक्त ओंबासे यांनी सूचना दिल्या. कुंभार वेस नाला ब्रिजचे काम प्रथम सुरुवात करण्यात येणार आहे. याप्रसंगी मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगु, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अभियंता मठपती, चोबे, हिबारे, उस्तरगे, कावळे, जगदाळे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत उदगिरी, आनंद उदगिरी, शिवा अक्के, श्रीकांत दासरी, भिमा दासरी, माऊली, भिकूसा कोल्हापुरे, अतिश कोळेकर, सुरेश जमादार, शरनू नांदणीकर उपस्थित होते.



