सोलापूरजिल्हा परिषद

मंगळवेढ्यातील बोराळे, माचनूर येथे एक झाड आईच्या नावावर

संकल्प सेवा अभियानांतर्गत सोलापूर झेडपीचा उपक्रम

सोलापूर : संकल्प सेवा अभियानात ग्रामस्थांना चांगल्या सेवा द्या. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत उपक्रम यशस्वीपणे राबवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत सोलापूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान सुरू आहे. या अंतर्गत मंगळवेढा पंचायत समितीस सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांनी भेट दिली. ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे व माचणूर येथे वृक्षारोपण करून शाळा व अंगणवाडींना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी जास्मिन शेख, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियान, स्वच्छता ही सेवा २०२६, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, घरकुल, शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, जी राम जी योजना, शैक्षणिक गुणवत्ता व शाळा खोल्यांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली. सेवा संकल्प अभियानात सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरीपत्राचे वाटप सीईओ कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी प्रकाश शिवशरण, कृषी विस्तार अधिकारी डोरले, ग्रामपंचायत अधिकारी जमीर मुलाणी, ग्रामपंचायत अधिकारी संगीता माने (माचणूर), स्वच्छ भारत मिशनचे एकनाथ जगताप व धर्मराज संखनवर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button