सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीचे सीईओ कुशल जैन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले कार्याचे कौतुक

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सीईओ जैन यांची कार्यपद्धत व कामाच्या शैलीबाबत कौतुक केले आहे.

filter:

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा रविवारी वाढदिवस झाला. कार्यालयीन कामकाजाला सुट्टी असल्यामुळे आज सोमवारी सीईओ जैन कार्यालयात आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. माहिती कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सीईओ जैन यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले आदी उपस्थित होते. सीईओ यांच्या दालनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ओएसडी अजयकुमार घुले, करकंबचे जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सीईओ जैन  यांचा सन्मान केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button