खरिपातील नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारंबा भेटीत शेतकऱ्यांची संवाद साधताना घोषणा

सोलापूर : खरीप हंगामात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता दौरा केला. उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे रंबा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पीक नुकसानीची पाहणी!
उत्तर सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक भोरे यांच्या शेतातील उडीद पिकांची पाहणी केली. तसेच संजय आदाटे यांच्या शेतातील जळालेले सोयाबीन पीक पाहून १००% नुकसान झाल्याची परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विनायक सुतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदी उपस्थित होते.



