संघटना-संस्थासोलापूरसोलापूर शहर पोलीस

पोलीस आयुक्तांच्याहस्ते सई सारोळे हिचा सन्मान

सोलापूर : पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सई सारोळे हिचा सन्मान करण्यात आला.

पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी पोलीस बॉईज असोसिएशनच्या प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्याहस्ते पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर थिटे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनची भूमिका विशद केली. दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवलेल्या सई सारोळे हिचा यावेळी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पोलीस बॉईज असोसिएशनच्या शहराध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, शहर उपाध्यक्ष राजश्री पाटील, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड मानसी कुलकर्णी, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रांजली हिंगे, शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पद्मिनी सारोळे, युवती आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षा अतनुरे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button