सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयमहाराष्ट्र

अभिनंदन..! मनीषा कुंभार, नाटेकर, पवार झाले अपर जिल्हाधिकारी

शासनाने जाहीर केल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नतीवर नियुक्ती

सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि माजी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना शासनाने अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देत नवीन नियुक्ती दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने विभागामार्फत निवड सूची कार्य 2024- 25 उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गात पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी मंगळवारी जाहीर केले .यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देत मुंबईच्या उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाकडे नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांना मुंबईच्या झोपडपट्टी प्राधिकरणचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे तर क्षमा पवार यांना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button