सोलापूरऐतिहासिक

सोलापूरची ओळख सांगणारी आणखी एक ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त

गिरणगावचा इतिहास सांगणारा लक्ष्मी- विष्णू मिलचा वारसा

सोलापूर : गिरणगाव म्हणून सोलापूरची ओळख सांगणारी आणखी एक ऐतिहासिक ‘चिमणी” (कापड गिरणीचे धुराडे) गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. मंगळवेढा रोडवर मरीआई चौकाच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मिलची ही चिमणी खाजगी जागेत होती. ही चिमणी गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे सोलापूरची आणखी एक ऐतिहासिक ओळख पुसली गेली आहे. सोलापुरात या परिसरात लक्ष्मी व विष्णू अशा दोन मिल प्रसिद्ध होत्या. या मिल बंद पडल्यावर कामगारांची देणी देण्यासाठी सरकारतर्फे जागेचा लिलाव झाला. खाजगी विकासाने ही जागा विकत घेतली. विष्णू मिलच्या जागेवर यापूर्वीच भव्य संकुल झाले आहे. लक्ष्मी मिलच्या या जागेत दिमाखात उभी असलेली विटांनी बांधलेली ही चिमणी धोकादायक बनल्याचा अहवाल महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिला होता.  त्यामुळे विकासकाने ही चिमणी पाडून टाकल्याचा दावा करण्यात येत आहे. ही चिमणी पाडताना बघ्याची गर्दी जमली होती. पहा, हा या चिमणीचा शेवटचा व्हिडिओ…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button