सोलापूरजिल्हा परिषद

पंढरपूर पंचायत समितीला भेट देऊन उपाध्यक्ष पवार यांनी घेतला आषाढीचा आढावा

पंढरपूर – सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी बुधवारी पंढरपूर पंचायत समितीस भेट दिली. 31 मार्चच्या कामाच्या व्यापानंतरही पंचायत समितीचे सर्व कर्मचारी वेळेत हजर असल्याचा प्रत्यय उपाध्यक्ष पवार यांना आला. यावेळी उपाध्यक्ष पवार यांनी गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याकडून आषाढी यात्रा काळात करण्यात येणाऱ्या तयारी विषयी माहिती घेतली.

पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी भेट देऊन आषाढी यात्रा व पंचायत समिती मधील विकास कामांची माहिती व आढावा घेतला. या प्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे स्वागत गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पंचायत समिती परिसराची पाहणी केली. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. क्लीन व ग्रीन उपक्रम राबवून पंचायत समिती हरित केली आहे. परिसराची स्वच्छता व वृक्षारोपण पाहून उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पंचायत समितीचे कौतुक केले.

पवार यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी मंदिर समितीच्यावतीने उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे महावंस्त्र देऊन स्वागत केले. गटविकास अधिकारी अमोल जाधव, पंचायत समितीचे अधिक्षक शहाजहान तांबोळी, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button