सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपी अध्यक्ष वैद्य म्हणाले मी असं काही नाही बोललो

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कार्यप्रणालीबाबत मी असं काही बोललोच नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कार्यपद्धतीबाबत पदाधिकारी नाराज असल्याचे माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य म्हणाले की माझ्या तोंडी असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. असे मी कोणासमोर यापूर्वी बोललेलो नाही. माझी प्रतिक्रिया न घेताच अशा चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या आहेत. कामाच्या बाबतीत माझ्या ज्या अडचणी आहेत त्या थेट मी सीईओने बोलावून दूर करू शकतो. विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे कामे बंद होती. आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आषाढी वारीच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. ती कामे वेगाने सुरू आहेत. याबाबत आम्ही वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. नुकतीच विशेष सभा ही झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कोणतीही सभा घेण्याचा विषय नसताना सभेत विषय येणार अशा आशयाच्या विनाआधार बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अशी बातमी प्रसिद्ध करताना संबंधित आणि मला विचारायला हवे होते. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी सर्व विकास कामे मार्गी लावण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन अध्यक्ष वैद्य यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button