सोलापूरक्राईमराजकीय

अक्कलकोट काँग्रेस अध्यक्षाला झेडपीतील स्टंटबाजी आली अंगलट

सोलापूर : जिल्हा परिषदेत येऊन स्टंटबाजी करणे अक्कलकोट त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांना महागात पडले आहे. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाटील यांच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मल्लिकार्जुन पाटील (राहणार जेऊर, तालुका अक्कलकोट) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 132 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  30 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास माध्यमिक शिक्षण विभागात जाऊन पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कामकाज करू दिले नाही व शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनी कुलकर्णी करीत आहेत.

30 जून रोजी अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेत आले होते. माध्यमिक शिक्षण विभागाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात ते गेले. त्यावेळी शिक्षणाधिकारी जगताप हे कार्यालयात नव्हते. उपस्थित कर्मचारी व कामासाठी आलेल्या लोकांसमवेत त्यांनी आरडाओरडा करून शिक्षणाधिकारी फोन उचलत नाहीत, संस्थेची कामे करीत नाहीत म्हणून कार्यालय बंद करून कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच शिक्षणाधिकारी जगताप तेथे आले. त्यावेळी पाटील यांनी आरडाओरडा करून त्यांना काम करू दिले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button