सोलापूर : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडी, बीबी दारफळ परिसरात अवैध गौण खनिज उत्खननावर मोठी कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.
या कारवाईत ६ हायवा व १ पोकलँड जप्त करण्यात आले आहे. संबंधितांवर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार अवैध खनिज उत्खननाविरोधात कठोर कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर उपक्रमांना आळा घालण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोंडी, बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज उपसा करणारे 6 हायवा, 1 पोकलँड जप्त

More Stories
बबलाद शाळेतील अपघाताचे सत्य काय? अद्याप दोन मुले ऍडमिट
बबलाद शाळेत झोक्यामुळे छताचे प्लास्टर पडून विद्यार्थी जखमी
शिक्षणाधिकारी कादर शेख यांची नियुक्ती लटकली; मुळे यांच्याकडे स्वतंत्र पदभार