सोलापूरराजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जाधव परिवाराला लग्नानिमित्त मोबाईलद्वारे दिल्या शुभेच्छा

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंगळवारी सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यासाठी हरिभाई देवकरण प्रशाला येथे आले होते. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे प्रभाग क्र. २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी आपल्या परिवारातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण (मामा) जाधव यांचा नातू अ‍ॅड. अनिल लक्ष्मण जाधव यांचे ज्येष्ठ सुपुत्र अजिंक्य आणि तनिषा यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त ही विनंती करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत व्यस्त दौऱ्यामुळे त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. तरीही माजी आमदार राम सातपुते यांच्या मोबाईलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसन जाधव यांच्याशी संवाद साधत नवदांपत्यास मनःपूर्वक शुभाशीर्वाद दिले. तसेच लवकरच सोलापूर दौऱ्यादरम्यान जाधव परिवाराची भेट घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांच्या मोबाईलद्वारे दिलेल्या शुभेच्छांमुळे जाधव कुटुंबीयांमध्ये मुख्यमंत्र्याच्या या साधेपणाने व कार्यकर्त्याप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे जाधव कुटुंबियांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता अशी भावना किसन जाधव यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button