सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष दीपक वैद्य यांच्याहस्ते ध्वजारोहण

सोलापूर : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक अरुण वैद्य यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले.

या दिमाखदार सोहळ्यास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता नागनाथ वाघे, सदस्या चैताली मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, आणि कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button