सोलापूरसंघटना-संस्था

ॲनिमल राहतच्या डॉक्टरांमुळे वाचले कुत्र्याचे प्राण

सोलापूर : ॲनिमल राहत संस्थेच्या डॉक्टरांमुळे एका भटक्या कुत्र्याला जीवदान मिळाले आहे.

रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गंगामाई हॉस्पिटल जवळील प्राणिमित्र सुरेश कांबळे यांनी
ॲनिमल राहत सोलापूर या आपत्कालीन नंबरवर फोन केला. डॉ.स्नेहा सुरवसे यांनी हा कॉल रिसिव्ह केला. भटक्या कुत्र्याला कोणीतर रबर अडकविले असल्याचे समजताच त्यांनी या प्रकाराची माहिती डॉ. अजित यांना
दिली. डॉक्टर अजित यांनी घटनास्थळी पंधरा मिनिटात धाव घेतली.  तेथे एका घराजवळ बसलेल्या कुत्र्याची अवस्था पाहून त्यांनी डॉ. स्नेहा सुरवसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार  त्या कुत्र्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर रबर काढून त्या कुत्र्याला पुढील उपचारासाठी ॲनिमल राहत संस्थेच्या दवाखान्यात दाखल केले. यासाठी ॲनिमल राहतचे पशुवैद्यकीय अधिकारी आकाश जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी स्नेहा सुरवसे, अजित मोटे, विजय चव्हाण  यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button