सोलापूर

झेडपीतील आंदोलनकर्त्यांना ‘गाजर” दाखवणारा तो ‘गाजरे” कोण?

माध्यमिक शिक्षण विभागात दलाली करून अनेकांना गंडवले

सोलापूर : झेडपीसमोर आंदोलन करणाऱ्यांना ‘लक्ष्मी”चे गाजर दाखवून स्वतःच्या पदरात मोठी माया पाडून घेणारा तो ‘गाजरे” कोण ? अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात रंगली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग गेल्या काही वर्षांपासून वादातीत ठरला आहे. येथे काम करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू दिले जात नाही. अधिकाऱ्यांच्या ओळखी आहेत  कामे करून देतो असे तेथे आलेला शिक्षकांना थापा मारून आपला कार्यभाग साधून घेणारे मोठी दलाल मंडळी या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ठाण मांडून बसली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यात ‘गाजरे” या दलालाने मोठा कहर केला असल्याची चर्चा आहे. त्या दलालाने माध्यमिक शिक्षण विभागाबरोबर पुणे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखी आहेत,  असे सांगून अनेक शिक्षकांकडून पैसे उकळल्याची चर्चा आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन झाले होते. त्या आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांची चौकशी लावली होती. हे प्रकरण मिटवण्यासाठी या दलालाने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. संबंधितांकडून 24 ‘पेट्या” घेऊन आंदोलनकर्त्यांची मात्र 4 पेट्यावर बोळवण केल्याची धक्कादायक चर्चा माध्यमिक शिक्षण विभागात सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना गाजर दाखवणारा हा दलाल ‘गाजरे” कोण ? अशी चर्चा आता जिल्हा परिषदेत रंगली आहे. लवकरच या दलालाचा पर्दाफाश केला जाईल,  असा इशारा एका राजकीय संघटनेने दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button