सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मुंबईत सन्मान

सोलापूर : निवडणूक तयारीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा आज मुंबईत सन्मान करण्यात आला.

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याहस्ते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावतीने उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  राज्य निवडणूक आयोगाने सन 2024 मधील भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना ” विशेष जिल्हाधिकारी” म्हणून पुरस्कार जाहीर केला होता. जिल्हाधिकारी आशीर्वाद हे जिल्हास्तरीय बैठकांमध्ये व्यस्त असल्याने हा पुरस्कार घेण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नि-हाळी यांना मुंबई येथे पाठविले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button