सोलापूरउद्योग

अण्णासाहेब पाटील महामंडळातून सोलापुरात २१ हजार मराठा उद्योजकांना १५९४ कोटींचे कर्ज वाटप

लोकनेते अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त सोलापुरात अभिवादन

सोलापूर : मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी तसेच युवकांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी आयुष्य वेचणारे लोकनेते माजी आमदार कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीत अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून प्रेरणादायी विचारांना उजाळा दिला. अण्णासाहेब पाटील यांनी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योग-व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी समाजहिताचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

*महामंडळाची ठळक कामगिरी:*
– *एकूण पात्रता प्रमाणपत्र (LOI) : २१,७१६*
– *एकूण बँक कर्ज मंजुरी लाभार्थी : १८,६२२*
– *बँकेने वितरित केलेली एकूण रक्कम : १५९४ कोटी २५ लाख ३९ हजार ५०३ रु.*
– *आजपर्यंत व्याज परतावा झालेली रक्कम : २०६ कोटी ४१ लाख ३३ हजार ६५८ रु.*

*व्यवसाय निहाय लाभार्थी:*
शेतीपूरक व्यवसाय – १२,५७०, खाद्यपदार्थ व्यवसाय – ३००, उत्पादन व निर्मिती उद्योग – १८३, सेवा उद्योग – ४,०१०, खरेदी-विक्री व्यवसाय – १,२०६, इतर – २७

या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे माढा तालुका अध्यक्ष निलेश देशमुख, माळशिरस तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे, लाभार्थी अविनाश मुळीक, आबा चव्हाण, सागर दळवी व जिल्हा समन्वयक योगेश वाघ, अंजली तानवडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button