सोलापूरआरोग्य

मंद्रूपमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त आरोग्य तपासणी

नागरिकांमध्ये हृदयविकार तसेच विविध असंसर्गजन्य आजारांविषयी जनजागृती

मंद्रूप : जागतिक हृदय दिनानिमित्त नागरिकांमध्ये हृदयविकार तसेच विविध असंसर्गजन्य आजारांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, कंदलगाव आणि डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने मंद्रूप येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलम घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

शिबिराचे उद्घाटन मंद्रूपचे प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक गणेश शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे होते. यावेळी आर. के. कन्स्ट्रक्शनचे प्रमुख मोतीलाल राठोड, उद्योगपती मिथुन मुगळे, डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक अभिजीत जवळकोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद जाधव, पोलीस पाटील सैपन बेडगे, सोमशंकर जवळकोटे, पत्रकार अमोगसिद्ध लांडगे, बिसलसिद्ध काळे, राजकुमार कस्तुरे, अविनाश जवळकोटे, आदित्य जवळकोटे, पंडित म्हेत्रे आदी उपस्थित होते. या शिबिरात बीएसएल शुगरच्या ४५, शुगरच्या ५५, बीपीच्या ६०, ईसीजीच्या ४१ आणि इतर ४ अशा एकूण २०५ तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांना बीपी, शुगर, बीएसएल आणि ईसीजी तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो. वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद जाधव यांनी जागतिक हृदय दिनाचे महत्त्व सांगून हृदयाची काळजी कशी घ्यावी, हृदयविकारापासून कसे वाचावे, याबाबत मार्गदर्शन केले. आर. के. कन्स्ट्रक्शनचे प्रमुख मोतीराम राठोड यांनीही आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगून बीपी व शुगर असलेल्या रुग्णांनी योग्य आहार घेण्यासोबत नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कंदलगाव यांचे सहकार्य लाभले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सेवक विजय अडोळे, रमेश भैरगोंडे, आरोग्य सेविका प्रिया भिसे, लक्ष्मी कमळे, आशा स्वयंसेविका सायली राठोड, राणी लोभे, सुज्ञानी शिंगाडे, शोभा नंदुरे, आशा गटप्रवर्तक जमेला नदाफ तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजू शेख यांनी सहकार्य केले. शेवटी संयोजक अभिजीत जवळकोटे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button