सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

सोलापूर जिल्हा जातपडताळणी अध्यक्षांनी घेतला पदभार

अनेक प्रलंबित विषय आता लागणार मार्गी

सोलापूर : सोलापूर जिल्हा समाजकल्याणच्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार गुरुवारी मंजुषा मिस्कर यांनी स्वीकारला आहे.

सोलापूर जिल्हा जात पडताळणी अध्यक्षाचे पद बऱ्याच वर्षापासून रिकामे होते. त्यामुळे प्रभारी अध्यक्षांवर कामकाज चालविले जात होते. यामुळे  अनेक विषय प्रलंबित असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. शासनाने सर्वच जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदावर नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी मंजुषा मिस्कर  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नियुक्तीनंतर गुरुवारी जात पडताळणी कार्यालयात मंजुषा मिस्कर या पदावर हजर झाल्या. त्यांनी सोलापुरात यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.  त्यामुळेे जिल्ह्यातील कारभाराची त्यांना चांगलीच ओळख आहे. कडक व शिस्तीचे अधिकारी  म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप निर्माण केल्यामुळे जातपाडताळणीचे अनेक विषय मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button